Kavi Gress
२६ मार्च आज कवी ग्रेस यांचा स्मृतीदिन...
दुःख
विकायला आज
निघालो मी व्यथा
जुनी माझी कथा
कोण घेई ?
तुझ्या बाजाराचे
वेगळेच भाव
कसे माझे घाव
संपतील ?
हाडांच्या भिंती
मातीच्या या घरा
दुःखाचा हा भारा
कोण घेई ?
कोण घेई माझ्या
ओसाडचा भोग
त्याच्या घरा आग
लागायची ?
म्हणूनच माझी
दुःखावर माया
वेगळीच काया
हवी मला !
-ग्रेस
ते स्वतःच म्हणतात - 'मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परि खोल...'
Comments
Post a Comment