मी अवगुणी अन्यायी | किती
म्हणोन सांगो काई | आतां मज पायी | ठाव देई विठ्ठले || पुरे पुरे हा संसार | कर्म
बळीवंत दुस्तर | राहो नेदी स्थिर |एके ठायी निश्चळ || अनेक बुद्धीचे तरंग |
क्षणक्षणा पालटती रंग | धरू जातां संग | तंव तो होतो बाधक || तुका म्हणे आता | अवघी तोडी माझी चिंता | येउनि पंढरीनाथा | वासकरी
हृदयीं ||
-संत तुकाराम महाराज
अभंग २२३७
गाथा
Comments
Post a Comment