आज बऱ्याच दिवसांनी....
आज बऱ्याच दिवसांनी शाळेत सराव केलेल्या सुलेखनाचे काही कागद सापडले.ते बघून पुन्हा शाळेच्या कलामंदिरात (चित्रकला वर्ग) असल्याचे भासले.सोबतीला नवीन केलेलं काम आणि शाळेतलं काम बघून ते जुनंच काम भारी वाटायला लागलं.शाळेत सरांनी Calligraphy वेगळा तास नसता घेतला असता तर मी नसतोच असतो कोण तरी.तेव्हा बोरू,काळी शाई,कटनीबचे पेन,आलेखाचे पेपर याच्याशी ,मला कधीच जवळीक साधता आली नसती.प्रत्येक विषयाच्या वहीच्या सुरवातीपासून ते शेवट पर्यंत नुसतीच Calligraphyच सोबतीला Heramb Sagar(आत्ताचा kandy) Kiran Choudhari Praneet Gawari(PNG) अशी मंडळी....
आज त्या काळ्या कुळकुळीत ओल्या अक्षरानला हातात घेऊन पुन्हा इयत्ता ५वी तुकडी क मधला Sumit Chāvan झालोय...
आज त्या काळ्या कुळकुळीत ओल्या अक्षरानला हातात घेऊन पुन्हा इयत्ता ५वी तुकडी क मधला Sumit Chāvan झालोय...
Comments
Post a Comment